Kirit Somaiya | ‘ही’ ठाकरे सरकारची दडपशाही, किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of corruption) करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार होतो. हे ऊ नये यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगून माझा कोल्हापूर दौरा (Kolhapur tour) प्रतिबंधित केला आहे. माझ्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

सोमय्या यांनी हा आरोप करताना आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात की, ठाकरे सरकारची दडपशाही सुरु असून माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेशच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

मी मुलुंडमधील निलम नगरहून आज संध्याकाळी निघणार असून मी गिरगाव चौपाटीवर (Girgaon
Chowpatty) जाऊन गणेश विसर्जन करेन आणि तिथून संध्याकाळी सव्वा सात वाजता CSMT स्टेशनहून
महालक्ष्मी एक्सप्रेस (Mahalaxmi Express) पकडून मी कोल्हापूरला रवाना होईल, असे सोमय्या यांनी
ट्विटमध्ये म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पोलिसांनी दाखवला

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देऊ नका असा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले असून तो आदेश पोलिसांनी आपल्याला दाखवला असल्याचे सांगत ही ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

PMC Recruitment 2021 | पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Kirit Somaiya | kirit somaiya has made serious allegations against the thackeray government for ordering his arrest to suppress scam by hasan mushrif

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update