Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते (BJP Leader) आणि माजी खासदार (Former MP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पूत्र नील सोमय्यांसह (Neil Somaiya) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यानंतर फोटो ट्विट करुन किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने (Shinde Group) जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

 

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं की, ‘मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्री ना हाटविल्या बद्दल अभिनंदन केले.’ परंतु यावरुन आता शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. किरीट सोमय्या यांनी माफिया असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती.
नवनीत राणा (Navneet Rana) यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो, असे ते म्हणाले.
तर केसरकर यांनी यावर आक्षेप घेत आमच्यात मतभेत असले तरी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही असे ठरविलेले आहे.
किरीट सोमय्या जे बोलले आहेत ते आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,
परंतु होऊ शकला नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आक्षेप कळवला आहे.
त्यांना किरीट सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजप नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya has mentioned shiv sena chief uddhav thackeray as a mafia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

GST | नॉन – ब्रँडेड खाद्यान्न वस्तूंवर लगू होणार्‍या GST संदर्भात शुक्रवारी राज्यव्यापी व्यापारी परिषद

 

Aditya Thackeray | ‘गद्दार हे गद्दार असतात, ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दार उघडे’ – आदित्य ठाकरे

 

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा