Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेऊनच बोलले पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल, तर त्यांनी ती चूक सुधारायला हवी. तात्काळ माफी मागायला हवी, असे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे. सोमय्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर भाष्य केले आहे.

 

सोमय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनीय आणि आदरणीय आहेत. ते हिंदू धर्माचे रक्षण हार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संबंध हिंदुस्थानाला अभिमान आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कार्यातून आणि संघर्षातून प्रेरणा घेतो. त्यामुळे कुठे कोणाची त्यांच्याविषयी बोलण्यात चूक भूल झाली असेल, तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि पुढील वेळी काळजी घेतली पाहिजे, असे सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले.

 

किरीट सोमय्या हे पतसंस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार आहेत. त्याची सुरुवात राष्ट्रवादीच्या मंचर येथून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचसाठी ते लोणावळ्याला गेले आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक होते,
त्यांच्यावर अत्याचार केले जातात म्हणून पतसंस्थेच्या माध्यमातून भ्रष्ट्राचाराच्या विरोधात शुद्धीकरणाची
कारवाई करण्यात येत आहे, असे सोमय्या म्हणाले.

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya in pune criticized governor bhagat singh koshyari and mla prasad lad over shivaji remarks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Advt.

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे