Kirit Somaiya | ‘ठाकरे सरकारची माफियागिरी, मलिक वानखेडेंना मुस्लिम म्हणतात तर मुश्रीफ….’

पोलीसनामा ऑनलाइन Kirit Somaiya | अभिनेता शाहरुख खानचा (saha rukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan) एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केलीये. वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखवत एससी कोट्यातून नौकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या वादात उडी घेतली आहे.

 

सोमय्या यांनी ट्विटकरत या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. नवाब मलिक ड्रग माफियासाठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नसून मुस्लिम असल्याचा आरोप करतात.
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) १५,००० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी कंपनीचे नाव जयास्तुते ठेवतात, तर जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) अनंत करमुडेचे अपहरण करतात.
अजित पवार (Ajit Pawar) बेनामी व्यवहार द्वारा कारखाना लाटतात, हे सर्व ठाकरे सरकारची माफियागिरी असल्याचा आरोप सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाहीये.
शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही.
आरोग्य विभागात घोटाळा होतोय, पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं.
त्याच्यावर वयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे, अशी टीका वाघ यांनी केलीये.

 

Web Title : Kirit Somaiya | Kirit Somaiya on thackeray government nawab malik ncb officer sameer wankhede

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kranti Redkar | वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नवाब मलिकांवर पलटवार, म्हणाल्या – आरोप चोमडेपणासारखे, किचन पॉलिटिक्समधून बाहेर या

Dr. Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन 

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?