Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर प्रथमच किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार आरोप केले. हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना रद्द केलेल्या कंत्राटाची देखील चौकशी करण्यात येणार आहे. असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले आहे. असे यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर हसन मुश्रीफ प्रथमच माध्यमांसमोर बोलले. त्यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, विशिष्ट लोकांवरच ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर किरीट सोमय्यांनी जोरदार हल्लाबोल केला. किरीट सोमय्या म्हणाले की, ‘शरद पवार यांच्यामध्ये हिंमत असेल, तर मुश्रीफ यांच्या वक्तव्याला समर्थन द्यावे. मुस्लिम नेत्याला टार्गेट केले जात आहे. असं पवार यांनी म्हणावं. उद्धव ठाकरे यांनी म्हणावं हे मान्य आहे का? भ्रष्टाचार करताना जात आठवली नाही का? दोन्ही हातात झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी.’ असे यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याची चर्चा मध्यतंरी राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले किंवा नाही? याबाबतची भूमिका स्वतः चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर करावी. असे विधान किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की,
‘अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमार्फत ४९ कोटी ८५ लाख रुपये कसे मिळतात? हे मुश्रीफ यांनी सांगावं.
कंपनीमार्फत चेक दिला जातो, त्यानंतर मुश्रीफ यांच्यामार्फत तो चेक बँकेत जमा केला.
मुश्रीफ यांनी आपल्या जावयामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला ५० हजार रुपये देण्याचा जीआर काढला होता,
पण जीआर रद्द केला अस सांगितले जाते. मात्र, तुम्ही त्याला ठेका दिला होता की नाही हे सांगा.
दरवर्षी राज्यातील ग्रामपंचायतीना १५० कोटींचा भुर्दंड बसणार होता.
हे कंत्राट कसं दिलं या सगळ्याची चौकशी होणार आहे.’ असंही यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya says chandrakant patil should clarify his position whether hasan mushrif was invited to join bjp or not

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा