Kirit Somaiya | ‘राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या, लॉकडाउनच्या धमक्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राज्यात कोरोना संसर्गांचे (Coronavirus) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे.
दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध (Restrictions) लागेल का? अशा चर्चा जोर धरत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील राज्यात निर्बंध लावण्याची तयारी दर्शवली आहे.
अशातच आता भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे.
‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ‘काही सत्ताधारी नेते स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने कोरोनाची तिसरी लाट अशी भीती जनतेमध्ये पसरवत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
तर, काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाउन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे,’ असं ते म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणााले, ‘ओमिक्रॉनच्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाहीये.
दोन-तीन दिवसांत लोक बरी होतात.
खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे.
दरम्यान, कोरोनापासून सावधान राहा. घाबरण्याची गरज नाहीेये,’ असं देखील किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Kirit Somaiya | kirit somaiya says coronavirus third wave and lockdown threat given for political and money gain by some politicians

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडून दोन शासकीय कर्मचाऱ्यांना अटक

 

How To Control Hypertension | हिवाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी डाएटमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

 

Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा