Kirit Somaiya | ‘ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण… कधी सुप्रिया सुळे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | सक्तवसुली संचालनालयाने (ED) सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर धाड टाकली. यानंतर ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. यावर भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कारवाई करत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) प्रकरणाच्या कारवाईचा संदर्भ दिला आहे.

 

”संपूर्ण पवार कुटुंब ग्लिसरीन घेऊन रडत होतं,” अशी खोचक टीका किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.
त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवारांचा जरंडेश्वर जप्त झाला ना ?, न्यायालयाने मान्यता दिली ना ? शरद पवार पण रडत होते.
ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते टीव्हीवर.
सगळ्या चॅनेलवर. कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) रडताना दिसायच्या. कधी त्यांच्या ताई कधी कुणाची माई, कधी कुणाची बायको, कुणाचा मुलगा.. सगळे लाईनीत पवार. सदनभर पवार रडत होते ग्लिसरीनच्या बाटली वापरुन,” असा टोला त्यांनी लगावला.
“का ओ ? आता न्यायालयाने दिले ना. अजित पवारांवर बेनामी संपत्तीच्या अंतर्गत पण चौकशी सुरुय.
तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असं होणार नाही.”

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, ”हे पटोले असो किंवा त्यांचा वकील असो की कोणीही असो, घोटाळा केला कारवाया होणार.
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मेहुणा, उद्धव ठाकरेंची पत्नी, उद्धव ठाकरेंचा मोठा मुलगा आहे, उद्धव ठाकरेंचा छोटा मुलगा आहे.
म्हणून त्यांना मनी लॉण्ड्रींग करण्याचा अधिकार नाही मिळत. कारवाया होणार,” असं सोमय्या म्हणाले.

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya says whole pawar family was crying after ed took action against ajit pawar in jarandeshwar sugar factory case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा