Kirit Somaiya | विरोधकांच्या घोटाळ्यांचा हिशोब नववर्षात चुकता करणार; किरीट सोमय्यांचा ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | १ जानेवारीपासून नववर्षाचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यामध्ये राजकीय वर्तुळामधूनही शुभेच्छा व नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. यातच आता भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटरद्वारे व्हिडिओ शेअर करताना विरोधकांना इशाराच दिला आहे.

 

भाजपा पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी व्हिडिओ ट्विट करत विरोधकांना इशारा दिला असून, त्यात त्यांनी उद्धव ठाकरे, अनिल परब, किशोरी पेडणेकर, हसन मुश्रीफ व माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावांचा समावेश आहे.

 

 

नववर्षाला उद्यापासून सुरुवात होत असून, मी विरोधकांचा हिशोब चुकता करण्यास प्रारंभ करणार आहे. यामध्ये ठाकरेंचे १९ बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ व किशोरी पेडणेकरांचा मुंबई पालिकेतील हिशोब चुकता करणार असल्याचे म्हणत सोमय्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे.

काही दिवसांपासून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,
आमदार अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यावरही घोटाळ्याप्रकरणी आरोप करत आहेत.

 

गत दोन दिवसांआधीच सोमय्यांनी ट्विट करत त्यामध्ये मी नववर्षारंभालाच म्हणजे १ तारखेला रेवदंडा पोलिस ठाण्यात ठाकरे
व वायकरांच्या कोलई अलिबाग येथील १९ बंगला घोटळाप्रकरणी तक्रार करणार असल्याचे नमूद केले आहे.

 

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya warning to uddhav thackeray will bring
out the scams of the opponents in the new year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा