Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सतत महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मंत्र्यावर अनेक गंभीर आरोप करत आहेत. नुकतंच राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात सतत कुजबूज होताना दिसत आहे. आता किरीट सोमय्यांनी कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Factory) 5 ऑक्टोबर रोजी भेट देणार असल्याचं म्हटलं आहे.

आज (मंगळवारी) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे कोल्हापूर दौ-यावर होते. दरम्यान, जाताना जरंडेश्वर कारखान्याच्या शिष्टमंडळाने किरीट सोमय्या यांची आज (मंगऴवारी) सकाळी 7 वाजता भेट घेतली. जरंडेश्वर कारखान्याची सर्व माहिती देऊन त्याबाबतची फाइलच सोमय्या यांच्याकडे त्यांनी सोपवली आहे. त्यानंतर जरंडेश्वर कारखान्याला भेट देण्याबाबत सोमय्या यांनी संचालकांना आश्वासन देखील दिले आहे. 5 ऑक्टोबर रोजी भेट देणार असल्याचं त्यांनी संचालकांना सांगितलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या हे कोल्हापुरकडे जात होते. त्यावेळी सकाळी उंब्रज या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांचे स्वागत केले.
याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
ठाकरे सरकारने स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी माझ्यावरील कोल्हापूर जिल्हाबंदीचा आदेश उठविला असला तरी अशा बंदीची पर्वा मी करत नाही असे म्हणत,
हिम्मत असेल तर ठाकरे सरकार व शरद पवार (Thackeray government and Sharad Pawar) यांनी मला अडवून दाखवावे,
असं त्यावेळी किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी अंबामातेने मला शक्ती द्यावी,
अशी प्रार्थना करतानाच या लढाईत जनता माझ्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.
तिथून मग सोमय्या पुढच्या प्रवासाला निघाले.
त्यावेळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उंब्रज येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya will visit jarandeshwar factory on october 5 give challenge to sharad pawar and cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 109 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी