Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी आयकर विभागाची फसवणूक केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. ठाकरेंच्या नावे 19 बंगले आहेत. पण त्यांनी आयकर विभागापासून ही माहिती लपवली, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबाने गायब केलेल्या बंगल्याचा हिशोब घेणार आणि तो घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असे सोमय्या म्हणाले आहेत. नाशिक येथे आयोजित ब्राम्हण महासंघाच्या कार्यक्रमासाठी सोमय्या (Kirit Somaiya) आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यांचा हिशोब देणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावे करार केला होता. स्वत: च्या नावाने त्यांनी मालमत्ता विकत घेतली होती. मात्र, आयकर विभागाला ही माहिती त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे त्यांची चोरी पकडली गेली आहे. त्यांचे 19 बंगले गेले कुठे? उद्धव ठाकरे 19 बंगल्यांचा हिशोब का देत नाहीत? 9 वर्षे त्यांनी त्यांची घरपट्टी भरली नाही, या सर्वाचा हिशोब द्यावा लागेल, असे सोमय्या (Kirit Somaiya) यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी इतरही मुद्यांना हात घातला. कोरोनाबाबत चौकशी करत असताना मुंबई पालिका आयुक्तांना भीती का वाटत आहे. कोरोना काळातील ऑडीट करावेच लागणार. संबंधितांनी कुटुंबाच्या नावाने कंपन्या काढल्या आणि कमाई केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा देखील यात समावेश आहे. सुजित पाटकर यांनी 100 कोटींचे काम मिळवले होते. त्यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे. मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये. कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला. दोन रुपयांची वस्तू यांनी दोनशे रुपयांना दाखवली. 11 बोगस कंपन्या काढून खर्च दाखवला, असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somayya will take account of thackeray family s missing bungalow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anushka Sharma | अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…

IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पुणे पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट फेटाळला