
Kirit Somaiya | नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे चिरंजीव नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. वसई मधील (Vasai) जमीन खरेदी केल्याप्रकरणी नील सोमय्या यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 7 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले गेले आहेत.
नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये (Nikon Infra Construction) पीएमसी बँक घोटाळ्यामधील (PMC Bank Scams) आरोपी राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) हे भागीदारी आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी सोमय्यांनी जवळपास 400 कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तसेच, ‘हे बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं होतं. (Kirit Somaiya)
दरम्यान, संजय राऊतांचे हे सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले होते. “नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशी देखील संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होता. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला घाबरत नाही,” असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. या दरम्यान, आता किरीट सोमय्या यांच्या मुलाची सुरु असणारी चौकशी आणि काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावरील कारवाईमुळे परस्पर चौैकशींचा संघर्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Web Title :- Kirit Somaiya | mumbai police launches probe against neil kirit somaiya
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update