Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केला आहे. ठाकरे सरकारचे (Thackeray government) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार, उलाढाल आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. याशिवाय पवारांचे मित्र, बिल्डरांकडून अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची (100 पेक्षा अधिक) अपारदर्शक नामी आणि बेनामी आवक असल्याची माहिती किरीट सोमय्या ((Kirit Somaiya) ) यांनी दिली. तसेच मोहन पाटील (Mohan Patil) हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे (Jarandeshwar Sakhar Factory) एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपये ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे.

अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar), मुलगा पार्थ अजित पवार (Parth Pawar), आई आशाताई अनंतराव पवार (Ashatai Anantrao Pawar), बहीण विजया मोहन पाटील (Vijaya Mohan Patil), जावई मोहन पाटील (, बहीण नीता पाटील (Neeta Patil) यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेली 19 दिवस आयकर (Income tax) आणि आता ईडीचे (ED) धाडसत्र आणि शोध ऑपरेशन सुरु आहे. 1 हजार 50 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, तसेच 184 कोटी रुपयांची रोकड, दागिने, आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याची माहिती किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे.

याशिवाय जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड साखर कारखाना, श्री अंबालिका शुगर प्रा. लि. व अन्य कंपन्यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. अजित पवार परिवाराच्या, समूहाच्या विभिन्न कंपन्यांच्या बरोबर केलेली हेराफेरी समोर येत आहे.

1. गुरु कमोडिटी सर्विसेस प्रा. लि. (Guru Commodity Services Pvt. Ltd.)

2. स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. (Sparkling Soil Pvt. Ltd.)

3. फायर पॉवर मार्केटिंग (इंडिया) प्रा. लि. (Fire Power Marketing (India) Pvt. Ltd.)

4. नॉन-कॉन एनर्जीज (इंडिया) प्रा. लि. (Non-Con Energies (India) Pvt. Ltd.)

5. आर्या अ‍ॅग्रो बायो अ‍ॅण्ड हर्बल्स प्रा. लि. (Arya Agro Bio and Herbals Pvt. Ltd.)

6. जय अ‍ॅग्रोटेक प्रा. लि. (Jay Agrotech Pvt. Ltd.)

7. कल्प वृक्षा प्रमोटर्स प्रा. लि. (Kalpa Vriksha Promoters Pvt. Ltd.)

8. सूर्यकिरण अ‍ॅग्रो इस्टेट्स प्रा. लि. (Suryakiran Agro Estates Pvt. Ltd.)

9. ओंकार रिअल्टर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स (Omkar Realtors and Developers)

10. शिवालिक बिल्डर्स प्रा. लि. (Shivalik Builders Pvt. Ltd.)

11. ओंकार रिअल्टर्स प्रा. लि. (Omkar Realtors Pvt. Ltd.)

12. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. (Jarandeshwar Sugar Mills Pvt. Ltd.)

13. गूफी ग्राफिक्स प्रा. लि. (Goofy Graphics Pvt. Ltd.)

14. गोयल गंगा इस्टेट अ‍ॅण्ड प्रॉपर्टीस प्रा. लि. (Goyal Ganga Estate and Properties Pvt. Ltd.)

Pune Crime | गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ! परदेशी निघालेल्या एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर पकडलं; दाम्पत्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाचे पुण्याकडे ‘प्रयाण’

वरील अनेक कंपन्यांचा आर्थिक व्यवहारा अंतर्गत ट्रान्सफर केलेले पैसे बेनामी असून संपत्ती आणि मनी लॉड्रिंगसाठी कंपनीची लेयर/शिडी तयार करणे, कोरोडो रुपयांची फेराफेरी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अजित पवारांनी नामी-बेनामी संपत्तीसाठी पवार परिवाराचे जावई मोहन पाटील यांचा ही उपयोग केलेला दिसत आहे. ईडी आणि आयकरची चौकशी सुरु आहे.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kirit Somaiya | ncp leader ajit pawars son law mohan patils crore financial transactions allegation kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update