Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता देखील अनिल देशमुखांच्या वाटेनेच जाणार’ – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यापासून भाजप (BJP) आणि सत्ताधारी आघाडी सरकार यांच्यात अनेक कारणावरुन राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळतं. दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आघाडी सरकारमधील नेते, मंत्र्यांवर आरोपांचं सत्र सुरुच ठेवलं आहे. नुकतंच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशी केली गेली. यावरुन किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे सध्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या रडारवर आले आहेत. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, ‘आता प्राजक्त तनपुरेही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वाटेवर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, ‘ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर लवकरच कारवाई होईल. तर, शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला लवकरच कळेल. लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने वळवण्यात आले. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली गेली, तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे.

प्राजक्त तनपुरे यांची ED कडून चौकशी –
काल मंगळवारी ईडीकडून (ED) प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची 7 तास कसून चौकशी करण्यात आली होती.
महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी केली गेली.
महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने ज्या कारख्यान्यांना कर्जे दिली होती त्यात
अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे.
हे कर्ज दिल्यानंतर पुढे सन 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता.
त्यावेळी हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. या कारखान्याची मूळ किंमत होती 26 कोटी रुपये.
परंतु, असं असतानाही तनपुरे यांच्या कंपनीने हा कारखाना फक्त 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता.
या पार्श्वभुमीवर त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | ncp leader and minister prajakt tanpure also face action like anil deshmukh says kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्‍यावर येणार

Pune Crime | मनाविरूध्द पत्नी PhD करते म्हणून छळ, पतीविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा