Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपुर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. यावरुन महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाले. आजही या मुद्यावरुन सोमय्यांनी टिपण्णी दिली आहे. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाहीत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करत आहेत. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलंय. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. मुुश्रीफांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नसल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज (सोमवारी) सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) शिवसेनेचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) व त्यांचा पुत्र अभिजित (Abhijit Adsul) यांना समन्स बजावण्यात आला. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील 980 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. यावरुनही सोमय्यांनी (Kirit Somaiya) निशाणा साधला आहे. सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. अडसूळ आणि उद्धव ठाकरे याबाबत उत्तर देत नाहीत. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यावधी रुपये खासगी खात्यात वळवले. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ED ला कारवाई करावी लागली, असं सोमय्या म्हणाले.

Web Title :- Kirit Somaiya | no one will be able save hasan mushrif attack bjp leader kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Online Rummy | हायकोर्टचा मोठा निर्णय; म्हणाले – ‘ऑनलाइन रमी एक कौशल्यपूर्ण खेळ, यावर बंदी घालणे असंवैधानिक’

Amravati Crime | धक्कादायक ! 15 वर्षीय मुलीवर गावातल्याच तरुणाने केला अत्याचार

Sultan Died | 21 कोटींची बोली लागलेल्या धडधाकट ‘सुल्तान’चे ह्रदविकाराच्या झटक्याने निधन; मालक बेनीवालांचा दावा