Kirit Somaiya On Mumbai CP Sanjay Pandey | मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे माफियागिरी करताहेत – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya On Mumbai CP Sanjay Pandey | भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र अशातच सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांना सोडणार नसल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. (Kirit Somaiya On Mumbai CP Sanjay Pandey)

 

माझ्यावर हल्ला झाला त्यामध्ये संजय पांडे यांच्या सांगण्यावरून खार पोलीस स्टेशनचे (Khar Police Station) अधिकारी सहभागी झाले होते. संजय पांडे माफियागिरी करत आहेत. राज्यपालांना मी सांगणार आहे याबद्दल चौकशी केली पाहिजे. संजय पांडे यांच्यावर कारवाई होणारच, असं म्हणत सोमय्यांनी पांडेंवर निशाणा साधला.

आम्ही केंद्रीय गृह सचिवांना (Central Home Secretary) देखील सांगितले आहे, मुंबई पोलीस (Mumbai Police) शिवसेनेच्या (Shivsena) गुंडाच संरक्षण करत आहेत.
मी ज्या एफआयआरवर (FIR) सही केली नाही त्याची संजय पांडेंनी चौकशी लावली हे सर्व बेकायदेशीर (Illegal) आहे.
संजय पांडे घाबरलेले आहेत त्यांना किरीट सोमय्या सोडणार नाही, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा,
गोपाळ शेट्टी, सुनील राणे, आणि वकील भेटायला जाणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

 

दरम्यान, माझ्या गाडीवर दगड फेक झालीच कशी पोलीस काय डोळे बंद करून बसले होते?,
सगळे लाईव्ह दिसत होतं. पांडेंची इच्छा होती?, किरीट सोमय्या यांच्या तोंडावर किंवा डोळ्यावर दगड लागला पाहिजे?,
असा सवाल करत सोमय्यांनी पांडेवर निशाणा साधला.

 

Web Title :- Kirit Somaiya On Mumbai CP Sanjay Pandey | BJP Leader Kirit Somaiya Attack Case Mumbai Police Commissioner Sanjay Pandey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा