Kirit Somaiya On Thackeray Government | किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा; म्हणाले – ‘ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उद्या बाहेर काढणार’

0
162
Kirit Somaiya shiv sena rebel mla sanjay gaikwad slam bjp leader kirit somaiya
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya On Thackeray Government | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचाव निधीसाठी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 58 कोटींची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर सोमय्यांवर गुन्हा (FIR) दाखल झाला. दाखल गुन्ह्यामध्ये सोमय्यांना हाय कोर्टाचा (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. यानंतर किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya On Thackeray Government)

 

माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ”न्यायालयाने हा 58 कोटींचा आकडा आला कुठून अशी विचारणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) प्रवक्ता 58 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात, लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होतो. पण गेल्या 10 दिवसांपासून एकही कागद ते देऊ शकलेले नाहीत. 58 कोटी कुठून आणले याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही,” असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya On Thackeray Government)

 

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांनी मागील 3 महिन्यात 10 नौटंकीचे प्रकार केले.

जेव्हा-जेव्हा ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्याची संपत्ती जप्त झाली, तेव्हा तेव्हा किरीट सोमय्यांवर आरोप केला जातो.

पंतप्रधानांनी पत्र लिहिलं गेलं. किरीट सोमय्यांनी घोटाळा केला म्हणून. उद्धव ठाकरेंनी SIT बसवली,

पण आज 2 महिने झाले काहीही निष्पन्न झालं नाही.” तर, ”किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या वसईतल्या कंपनीत 426 कोटी वाधवानने गुंतवले, पालघरच्या कंपनीत 260 करोड टाकले, राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) पार्टनर आहे, जुहूचा 100 कोटींचा जमीन घोटाळा, पवईचा SRA घोटाळा, असे अनेक आरोप केले पण काहीही निष्पन्न झालं नाही.”

 

दरम्यान, ”गेले दोन दिवस मी काही लोकांसाठी नॉटरिचेबल असेन, पण मी व्यवस्थित काम करत होतो,

आणि उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे,” असा जोरदार इशारा देखील सोमय्या यांनी दिला.

 

 

 

Pune Crime | प्रेम विवाहानंतर 5 महिन्यात तरुणीची आत्महत्या, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचलले टोकाचं पाऊल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणी NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन