Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya on Uddhav Thackeray | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष न्यायालयाने (Special Court Mumbai) घेतली आहे. नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी (Underworld Don Dawood Ibrahim) थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं कोर्टाने निरिक्षण नोंदवलं आहे. यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झालं, पण उद्धव ठाकरेंचेही त्याच्याशी संबंध आहेत का?’ असा जोरदार सवाल सोमय्यांनी केला आहे. (Kirit Somaiya on Uddhav Thackeray)

किरीट सोमय्या म्हणाले की, ”मलिक दाऊद गँगचे सदस्य हे सिद्ध झालं. पण आता चिंता महाराष्ट्राला ही आहे की जेलमध्ये गेल्यावर नवाब मलिकांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्माण झाले आहेत का? याबद्दल ठाकरेंनीच स्पष्टता करावी.” असं ते म्हणाले. (Kirit Somaiya on Uddhav Thackeray)

”बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) अनेकदा म्हटलं की शरद पवारांचे (Sharad Pawar) दाऊदशी संबंध आहेत. पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी भागीदारी केली आणि आता शरद पवारांचे पार्टनर दाऊदशी पण भागीदारी केली. कोट्यवधींची मालमत्ता फक्त लाखांत कशी घेतली? आता न्यायालय सांगतंय की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. असं असेल तर उद्धव ठाकरे, या शरद पवारांसोबत न्यायालयाविरोधात रस्त्यावर. असंही तुमचे प्रवक्ते न्यायालय विरोधात बोलत असतात,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

 

”उद्धव ठाकरेंना हा सगळा खंडणीचा प्रकार माहित होता. ठाकरे बिल्डर आहेत, त्यांचा मुलगा बिल्डर आहे. त्यांना या भागाचा दर माहित आहे. गोवावाला कंपाऊंड तर मातोश्री पासून जवळच आहे. काही लाखांत एवढी मोठी प्रॉपर्टी कशी घेता आली? उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधवांनी खूप जुन्या प्रॉपर्टी विकत घेतल्यात मग नवाब मलिकांनी लाखांत प्रॉपर्टी घेतली यात काय विशेष?,” असं ते म्हणाले.

”मी स्टेजवर बसून बाळासाहेबांची भाषणे ऐकलीयेत. दाऊद शरद पवारांचा माणूस आहे, ते दोघे एकाच विमानातून गेले. पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या मुलाने वडिलांचे विचारच गहाण ठेवले, हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिक आणि ठाकरे सरकारला आता शिक्षा जनताच देणार असल्याचे,” सोमय्या म्हणाले.

Web Title : Kirit Somaiya on Uddhav Thackeray | BJP leader kirit somaiya on nawab malik
and dawood connection ed action cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त