Kirit Somaiya On Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं नाव घेत सोमय्यांचे गंभीर आरोप; म्हणाले – ‘हेमंत करकरेंची हत्या कोणी केली ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya On Uddhav Thackeray | भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मंगळवारी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप केले. हेमंत करकरे यांची हत्या कोणी केली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संबंधित व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येशी संबंधित लोकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

 

”मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे.” असं किरीट सोमय्या म्हणाले.

 

पुढे सोमय्या म्हणाले, “हेमंत करकरे यांची हत्या 2 कारणांनी झाली.
ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केली.
पण, हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट नकली असल्याने झाला. बुलेटप्रुफ जॅकेट बोगस असल्याने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला.
त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल (Vimal Agarwal) याने केला होता.
त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली.”

दरम्यान, “ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी (Bulletproof Jacket Case) अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधववर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं.
यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत. जाधवांनी 1 हजार कोटी रुपयांची माया जमवली असल्याचं,” ते म्हणाले.

 

 

Web Title :- Kirit Somaiya On Uddhav Thackeray | BJP leader kirit somaiya serious allegations about murder of hemant karkare mention uddhav thackeray name

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा