Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात पुण्याच्या क्वॉर्टर गेट परिसरातून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शनिवारी पुण्यात धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी एका शिवसैनिकाला (Shivsainik) शिवाजीनगर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. सनी गवते (Sunny Gvate) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गवते याला पुण्यातील क्वॉर्टर गेट (Quarter Gate Pune) परिसरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivajinagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांनी सांगितले.

 

शिवाजी नगर पोलिसांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शर्ट भिरकावणाऱ्या सनी गवते याला अटक केली आहे.
मात्र, या हल्ल्यातील शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (Shivsena Sanjay More) तसेच किरण साळी हे अद्याप सापडलेले नाहीत.
पुणे पोलिसांकडून (Pune Police) त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.
हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

काय आहे प्रकरण ?
शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये (Covid Center) झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची (Pune Municipal Commissioner) भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी (दि.5) सायंकाळी पुणे महापालिकेत आले होते.
ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरुन जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 8 जणांवर 143,147,149,341,336,337 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे (Shivsena Pune city president Sanjay More),
चंदन साळुंके (Chandan Salunke), किरण साळी (Kiran Sali), सुरज लोखंडे (Suraj Lokhande),
आकाश शिंदे (Akash Shinde), रुपेश पवार (Rupesh Pawar), राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde), सनि गवते (Sunny Gvate) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | One arrested from Pune s Quarter Gate area in connection with attack on BJP leader Kirit Somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा