Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर; पुणे न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे राज्यातील महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi Government) नेत्यांवर सतत आरोप करताना दिसत आहे. नुकतंच सोमय्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा घेऊन गेले होते. यानंतर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्यांवर तोफ डागली आहे.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ”हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांचं कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना (Senapati Ghorpade Factory) यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात (Pune Court) तक्रार याचिका दाखल केली. फसवणूक, शेल कॉससाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे. लवकरच या प्रकरणावर सुनावणी होईल.” असं ते म्हणाले. दरम्यान, सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

दरम्यान, पुढे सोमय्या म्हणाले, ”श्री हसन मुश्रीफ, सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाईसाठी माझा पुणे दौरा आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | petition at pune court against hasan mushrif family kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा