Kirit Somaiya | ‘मला कळत नाही संजय राऊतांचे आभार मानू की आश्चर्य व्यक्त करू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तसेच हा घोटाळाही उघड करा असं देखील राऊत यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजपचे (BJP) जेष्ट नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

स्मार्ट सिटी अंतर्गत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला, ED, CBI चौकशीसाठी किरीट सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्राद्वारे केलं आहे. यावरून किरीट सोमय्या म्हणाले की, मला कळत नाहीये की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचं आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावीस असं सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे.

पुढे सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी
त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीचं प्रशासन आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे. कारण एक परमबीर सिंगही ते शोधू शकले नाहीत.
मी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की,
त्यांनी आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. असं सो़मय्या म्हणाले.

 

Web Title :- Kirit Somaiya | sanjay raut kirit somayya i am confused whether i should thank him or not

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘कर्णधार मोदींच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण पूर्ण’; फडणवीसांनी मानले PM मोदींचे आभार

7th Pay Commission | सरकारी कर्मचारी करताहेत DA वाढण्याची प्रतीक्षा, परंतु यांना मिळाले 19200 रुपयांचे Diwali Gift

Pune Corporation Vaccination | पुणे महापालिकेच्या ‘व्हॅक्सीन ऑफ व्हिल्स’ उपक्रमाला घरगुती कामगार, कलाकार, झोपडपट्टीतील नागरिक, मजूर वर्गाचा भरभरून प्रतिसाद