Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांचा माफिया म्हणून उल्लेख केला. यावरुन आता शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमय्या यांनी मविआ सरकारवर बोलताना गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा समाचार घेताना इशारा दिला आहे.

 

संजय गायकवाड म्हणाले, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी असं काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट समोय्यांनी करुन घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करु नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे भाजप व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

 

अन्यथा कारवाई होईल

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही टोल नाक्यावर टोल वसूली केली जात असल्याचे अनेक फोन मला आले आहेत. त्यामुळे मी टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करतो की वारकऱ्यांना त्रास न होता त्यांची वाहने जाऊ द्यावीत. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या ?

भाजपचे नेते आणि माजी खासदार (Former MP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पूत्र नील सोमय्यांसह (Neil Somaiya) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.
यानंतर फोटो ट्विट करुन किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफिया मुख्यमंत्री म्हटले.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं की,
‘मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
माफिया मुख्यमंत्री ना हाटविल्या बद्दल अभिनंदन केले.’

 

Web Title :-  Kirit Somaiya | shiv sena rebel mla sanjay gaikwad slam bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा