Kirit Somaiya | पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा ‘राडा’, किरीट सोमय्यांना दाखवले ‘काळे झेंडे’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे सुरु आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) दौऱ्यावर आले होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आज सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप (Allegations of scam) केला. तसेच घोटाळ्यांच्या कागदपत्रांचा तपशील मांडत ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार हल्लाबोल केला. याचदरम्यान सोमय्या यांना शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे पिंपरी चिंचवडमध्ये आल्याची माहिती शिवसेनेच्या कर्यकर्त्यांना समजताच त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यालयावर धडक दिली. कार्यालयासमोर येऊन सोमय्या यांना काळे झेंडे (Black flags) दाखवले आणि त्यांच्या निषेधात घोषणा दिल्या. यावेळी काही शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि इमारतीचे गेट बंद केले. तर दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांनीही गर्दी करत शिवसेनेला विरोध केला. दोन्ही बाजूकडून होणाऱ्या घोषणाबाजीमुळे काही वेळ याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

 

किरीट सोमय्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर पडले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
परंतु संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना रोखले.
पोलिसांनी गर्दी पांगवत सोमय्या यांना वाट करुन दिली व सोमय्या तेथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले.
या दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा सुरुच ठेवल्या होत्या.

 

Web Title :- Kirit Somaiya | shiv sena workers show black flags to kirit somaiya in pimpri chinchwad marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकार BSNL आणि MTNL ची मालमत्ता विकणार; 1100 कोटी रुपयांची उभारण्याची तयारी

EPFO ची मोठी घोषणा ! आता नोकरी बदल्यानंतर PF अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही, मध्यवर्ती सिस्टम येणार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 45 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी