Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादी-शिवसेना माझा घातपात करणार असल्याचं एसपीच बोलले’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | आज कोकणात दापोलीमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या दापोलीच्या दिशने निघाले असताना राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना दापोली पोलीस स्टेशनमध्ये (Dapoli Police Station) थांबवण्यात आलं होतं, तिथे त्यांच्यासोबत भाजप नेते निलेश राणेही (Nilesh Rane) आहेत. मात्र किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केला आहे.

 

राष्ट्रवादी-शिवसेना (NCP-Shivsena) माझा घातपात करणार आहेत. याबाबत मला एसपींनीच (SP) माहिती दिली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. दापोली पोलीस स्टेशनसमोर किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. एसीपी कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत असल्याचंही सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

 

एसपी पोलीस स्टेशनमधून बाहेर का येत नाहीत. आतमध्ये ते कोणासोबत फोनवर बोलत आहेत. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत असून वारंवार त्यांचे स्टेटमेंट बदलत आहेत. दोन माजी खासदार असताना एसपी एफआयआर दाखल करून घेत नाही?, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

 

दरम्यान, किरीट सोमय्या आणि निलेश राणे साई रिसॉर्टवर (Sai Resort Dapoli) जाण्याच्या भुमिकेवर ठाम आहेत.
त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Kirit Somaiya | SP spoke that NCP-Shiv Sena would assassinate me ‘; Serious allegations of Kirit Somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

 

Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे