Kirit Somaiya | 10 दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत आहे. दैनंदिन बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभं राहिलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोविड सेंटर (Covid Center) सुरू करावे लागत आहेत. दरम्यान या कोविड सेंटरच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे (BJP) जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आणखी एकदा महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘पुढच्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा उघड करणार असल्याचा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे. त्याच बरोबर कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचं कमाईचे साधन असल्याचा गंभीर आरोप देखील किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळते. यातच मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेते, मंत्री यांच्यावर आरोपांचे सत्र सुरूच ठेवले आहे. यानंतर आता सोमय्यांनी थेट कोविड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचा गंभीर इशारा दिला असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या आरोपानंतर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहावे लागणार आहे.

Web Title : Kirit Somaiya | thackeray government covid center scam to be exposed in ten days bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय