Kirit Somaiya | उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल – किरीट सोमय्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं (Kasba Ganpati) दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मी आज गणरायाचे धन्यवाद मानतो. गेल्या वर्षी गणरायाला निरोप देताना मी तुरुंगात जात होतो. आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगात बाहेर आला आहे. असे सोमय्या म्हणाले. मागील अडीच तीन वर्षात महाराष्ट्र जो मागे गेलाय त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याची शक्ती दे असंही गणराया चरणी म्हटल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुढे म्हणाले, ज्यावेळी ठाकरे सरकार (Thackeray Government) गेले त्यावेळी महाराष्ट्रावरील विघ्न टाळलं. आपल्या माफिया सरकारला आता महाराष्ट्राच्या जनतेने कायमसाठी रवाना केलंय. तुमचा उजवा हात तुरुंगात गेल्या आता डावा हातही जाईल. उद्धव ठाकरे तुम्ही आता पोराचीही काळजी करा.

 

पालिकेने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अस्लम शेख (Aslam Sheikh)
यांच्या आशीर्वादाने मढ मार्वेतील एक कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची (Studio Scandal Investigation) घोषणा केली आहे.
त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या एक हजार कोटींचा घोटाळा केला हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वत:च्या मुलाची काळजी करावी, असंही त्यांनी म्हटले.

 

Web Title :- Kirit Somaiya | uddhav thackeray should take care of his son kirit somaiya statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

 

Varsha Usgaonkar | …तर वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू

 

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड