खासदारांचे प्रगतीपुस्तक : महाराष्ट्रातील खासदार निधीच्या खर्चाची अशी आहे आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी आपल्या मतदारसंघातील खासदाराच्या चांगल्या वाईट बाबीवर चर्चा सुरु होते. अशातच महाराष्ट्रातील सर्वात जास्त निधी वापरणारा खासदार आणि सर्वात कमी निधी वापरणाऱ्या खासदारांची यादी समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त निधी खर्च करणारा खासदार देखील भाजपचा आहे आणि सर्वात कमी खर्च करणारा खासदार देखील भाजपचाच आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. तर लोकसभा निवडणूक सर्वाधिक मतांनी जिंकून देशात विक्रमी मते घेणाऱ्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या खासदार निधी खर्च करण्यात सर्वात मागे आहेत.

भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे २५ कोटी खासदार निधी खर्च केला आहे. अर्थात हा निधी म्हणजे एका पंचवार्षिक कालावधीमध्ये सर्वात जास्त निधी असून सोमय्या हे १००% खासदार निधी खर्च करणारे खासदार आहेत.  तर बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे या सर्वात कमी खासदार निधी खर्च करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. त्यांनी २५ कोटी पैकी फक्त ७.३२ कोटी खासदार निधी वापरला.

संसदेत केलेल्या कामगिरी बद्दल दिला जाणाऱ्या संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे या निधी खर्च करण्याच्या बाबत मात्र मागे पडल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी १२ कोटी ६५ लाख एवढा निधी खर्च केला असून त्या खासदार निधी वापराच्या बाबतीत शेवटून चौथ्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक निधी खर्च करणारे खासदार

किरीट सोमय्या  २५ कोटी – ईशान्य मुंबई (भाजप)
रामदास तडस  २३. ५७ कोटी – वर्धा (भाजप)
डॉ. श्रीकांत शिंदे २०. ३४ कोटी – कल्याण (शिवसेना)
डॉ. हीना गावित २०.२३ कोटी – नंदुरबार (भाजप)
पूनम महाजन २०.२२ कोटी – उत्तर मध्य मुंबई (भाजप)

सर्वात कमी निधी खर्च करणारे खासदार

डॉ. प्रीतम मुंडे  ७.३२ कोटी – बीड (भाजप)
भावना गवळी १०.५५ कोटी – यवतमाळ वाशिम (शिवसेना)
रावसाहेब दानवे १०.६७ कोटी – जालना (भाजप)
रक्षा खडसे १०.८९ कोटी – रावेर – जळगाव (भाजप)
सुप्रिया सुळे १२.६५ कोटी – बारामती- (राष्ट्रवादी)
उदयनराजे भोसले १२.४६ कोटी – सातारा (राष्ट्रवादी)