Kirron Kher | ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना करोनाची लागण; स्वतः ट्विट करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम : दोन वर्षांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा (BJP) खासदार किरण खेर (Kirron Kher) यांना कॅन्सरचे निदान झाले होते. आता त्यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. किरण (Kirron Kher) यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भातली माहिती चाहत्यांना दिली आहे. किरण यांना करोनाची लागण झाल्यानंतर चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत. किरण यांनी आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
किरण खेर यांनी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली आहे. यावेळी त्यांनी म्हटले की “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या प्रत्येकानी स्वतःची कोविड चाचणी (Covid Test) करून घ्या”. आता त्यांच्या या ट्विटमुळे चाहते त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्या लवकरच निरोगी व्हाव्या यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत.
I have tested positive for Covid. So anyone who has come in contact with me please get yourself tested.
— Kirron Kher (@KirronKherBJP) March 20, 2023
किरण (Kirron Kher) यांना नुकताच मल्टिपल मायलोमा झाला. त्यानंतर आता त्यांना कोरोना झाला आहे
त्या आधीच कॅन्सर रुग्ण असल्यामुळे त्यात आता त्यांना कोरोना झाल्याने सर्वांना त्यांची
जास्त काळजी वाटत आहे. तर दुसरीकडे पती अनुपम खेर (Anupam Kher)
देखील जवळचे मित्र सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनामुळे अजूनही दुःखात असल्याचे दिसत आहे.
Web Title : Kirron Kher | kirron kher tests positive for covid 19
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा