Kirtankar Indurikar Maharaj | …म्हणून इंदुरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम 30 मेपर्यंत रद्द

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Kirtankar Indurikar Maharaj | भारतातील कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Kirtankar Indurikar Maharaj) यांची प्रकृती ठीक (Health Deteriorated) नसल्याची माहिती समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आराम घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. प्रकतीच्या कारणास्तव 23 मे ते 30 मेपर्यंतचे त्यांचेे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

इंदुरीकर महाराजांचे (Kirtankar Indurikar Maharaj) किर्तन ऐकण्यासाठी सगळेच उत्साही असतात. पण आता पुढचे काही दिवस त्यांचे किर्तन ऐकता येणार नाही. कारण, त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे आगामी सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. इंदुरीकर महाराजांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम होते. मात्र, सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आयोजकांची गैरसोय झाली आहे. याबाबत इंदुरीकर महाराजांची दिलगीरी व्यक्त करत एक पत्रक जारी करण्यात आले आहे.

 

दरम्यान, सध्या त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
त्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेय. याबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त करत वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याचं देखील पत्रातून सांगितलं आहे.

 

Web Title :- Kirtankar Indurikar Maharaj | indurikar maharaj health deteriorated all programs till may 30 canceled nagar news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा