Kirtankar Tajuddin Maharaj | प्रसिद्ध किर्तनकार ताजुद्दीन महाराज कालवश; किर्तन सुरु असतानाच हृदयविकाराचा झटका (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – Kirtankar Tajuddin Maharaj | राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह. भ. प. ताजुद्दीन बाबा महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died) झाले आहे. काल (सोमवारी) रात्रीच्या दरम्यान किर्तन सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा (Heart attack) झटका आला, आणि ते खाली कोसळले. ही घटना नंदुरबार याठिकाणी घडली आहे.

ताजुद्दीन महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते मंचावरच खाली बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे किर्तनाचे लाईव्ह शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झालीय.

दरम्यान, ताजुद्दीन महाराजांचा (Kirtankar Tajuddin Maharaj) जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता.
त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनीमध्ये कामही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती.
त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला होता.
त्याचबरोबर हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली.
ते घनसावंगी (Ghansavangi Jalna) तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते.
त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळ उभे केले होते. महाराष्ट्रात कीर्तनाची एक मोठी परंपरा आहे.
अनेक कीर्तनकारांप्रमाणेच ताजुद्दीन महाराज हे सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा किर्तनकार थंडावला आहे.

हे देखील वाचा

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kirtankar Tajuddin Maharaj | kirtankar tajudding maharaj passed away while ongoing kirtan after suffering heart attack in nandurbar watch live video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update