Kirti Shiledar | संगीत नाट्यातला आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kirti Shiledar | जेष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन (Died) झाले आहे. त्या 70 वर्षाच्या होत्या. पुण्यातील (Pune News) दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital Pune) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज (शनिवारी) पहाटे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराला प्रतिसाद न मिळळाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 10 व्या वर्षी कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. अशाप्रकारे त्यांनी वयाची 60 वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली.
किर्ती शिलेदार यांनी 2018 साली 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. साधारण 6 दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. दरम्यान त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. तर, वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Web Title : Kirti Shiledar | kirti shiledar death veteran singer kirti shiledar passes away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का