Kirit Somaiya | किरीट सोमय्या बारामती दौऱ्यात कोणता गौप्यस्फोट करणार?, चर्चांना उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे बुधवारी (दि.6) शरद पवारांच्या (Sharad Pawar) बारामती (Baramati) दौऱ्यावर येत आहेत. मागील काही दिवसांपासून किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध राजकीय नेत्यांना ज्या प्रकारे लक्ष्य केले आहे, ते पाहता त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते बारामतीत आल्यानंतर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून चर्चांना उधाण आले आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer) असलेल्या खरमाटे (Kharmate) यांच्या मालमतत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येत असले तरी या निमित्ताने ते कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) बुधवारी साताऱ्याहून (Satara) कोरेगाव मार्गे जरंडेश्वर कारखान्यावर (jarandeshwar sugar factory) जाणार आहेत.
याठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर पुसेगाव मार्गे डिस्कळ वरुन ते फलटण येथे खासदार रणजित नाईक निंबाळकर (MP Ranjit Naik Nimbalkar) यांच्या घरी जाणार आहेत.

फलटण येथून दुपारी दोनच्या सुमारास बारामतीत येणार आहेत.
याठिकाणी खरमाटे यांच्या जागांची पाहणी करुन ते बारामतीच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून सायंकाळी जेजुरीत जाऊन खंडोबाचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे जाणार आहेत.

 

Web Title : Kirti Somaiya | kirit somaiya on baramati tour on wednesday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,840 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 162 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी