Breaking News : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेचा मास्टरमाईंड दीप सिद्धूला अटक

नवी दिल्ली : 26 जानेवारीच्या दिवशी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसा प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दीप सिद्धूवर दिल्ली पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. सिद्धूला स्पेशल सेलने अटक केली आहे.

 

 

 

 

 

स्पेशल सेलचे डीसीपी संजीव यादव यांनी सिद्धूच्या अटकेला दुजोरा दिला आहे. यादव म्हणाले की, मंगळवारी पोलीस एक पत्रकार परिषद घेऊन अटकेबाबत आणखी माहिती देतील. हे वृत्त देईपर्यंत समजले नव्हते की सिद्धूला कुठे अटक करण्यात आली.

हिंसेनंतर सिद्धू वेगवेगळ्या ठिकाणाहून फेसबुक लाइव्ह करत होता. त्याने शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. वृत्तानुसार, या प्रकरणात सिद्धूला फेसबुक लाइव्हमध्ये टेक्निकल मदत त्याची मैत्रिण करत होती जी देशाच्या बाहेर राहात आहे. याचा सुद्धा खुलासा दिल्ली पोलीस आपल्या पत्रकार परिषदेत करतील. फेसबुक लाइव्हच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सपासून वाचण्यासाठी सिद्धू, परदेशात बसलेल्या मैत्रिणीची मदत घेत होता.