शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! लक्षात ठेवावं 31 ऑगस्ट, अन्यथा द्यावं लागेल दुप्पट व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ही बातमी शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. अशा लोकांनी 31 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला डबल व्याज भरण्याची वेळ येऊ शकते. भले तुम्ही दोन दिवसांनी पैसे काढून घेऊ शकता. पण तेव्हा तुम्हाला मार्च 21 पर्यन्त मुदतवाढ मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले आहे त्यांनी पुढच्या 10 दिवसात कर्ज परत करायचे आहे. असे केले नाही तर डबल व्याज भरावा लागणार आहे.

लॉकडाऊन मध्ये देण्यात आली सूट

शक्यतो कुणीही कर्ज घेतले तर त्याला ते 31 मार्च पर्यंतच परत करावे लागते पण सरकारने लॉकडाऊन मुले 31 मार्च ते 31 ऑगस्ट अशी व्याजावर सूट देण्यात आली आहे. आता यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वेळेत पैसे जमा करा. कारण आता लॉकडाऊन संपला आहे. वेळेवर पैसे परत केले नाही तर, 4% अधिक व्याज भरावा लागेल.

केसीसी वर कसं कमी लागणार व्याज?

शेतीसाठी केसीसी वर घेतलेल्या 3 लाखपर्यंत कर्जावर 9% व्याजदर आहे. पण सरकार यामध्ये 2% ची सबसिडी देतं. आशा प्रकारे हा दर 7% इतका पडतो. पण वेळेवे कर्ज परत केले तर 3% अजून सूट देण्यात येते. आशा प्रकारे हा दर जागरूक शेतकऱ्यांना 4% इतकाच पडतो.