खुशखबर ! मोदी सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड’ स्कीममध्ये मोठे बदल ; ‘या’ व्यावसायिकांना देखील आता फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किसान क्रेडिट कार्ड योजना आता फक्त शेतीपुरती मर्यादित राहणार नाही. मोदी सरकारने या कार्डची सुविधा पशुपालन आणि मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील उपलब्ध केली आहे. फरक एवढाच आहे की या दोन्ही व्यवसायासाठी जास्तीजास्त २ लाखापर्यंत कर्ज घेता येईल. शेतकऱ्यांना या कार्डाचा वापर करून तीन लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. केंद्रीय मत्स्यपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

पशुपालन आणि मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास आता बँकेत जाऊन फक्त तीन कागदपत्र देऊन कर्ज घेता येणार आहे. सारंगी यांनी सांगितले की, सरकारने मत्सव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील किसान क्रेडिट कार्ड येणार आहे. यांमुळे हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज मिळेल आणि या व्यवसायांना चालना मिळेल.

देशातील ५० % शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड

कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकार किसान क्रेडिट कार्डाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे क्रेडिट कार्ड ५० % शेतकऱ्यांकडे आहे. देशामध्ये १४.५ कोटी शेतकरी परिवार आहेत. यांपैकी ७ कोटी शेतकऱ्यांकडे हे कार्ड आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी खूप किचकट प्रक्रिया असल्यामुळे हे कार्ड अजून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाही.

किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी तीन कागदपत्रांची आवश्यकता आहे. शेतकरी असल्याचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, शेतकऱ्याचे शपथपत्र या तीन कागदपत्राची कर्ज घेण्यासाठी गरज लागेल.

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

पुण्यातील रुग्णालये आणि कॉलेजमध्ये बेकायदा पार्किंग बंद करा – रिपाइं

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !