KCC : मोदी सरकारनं 111 लाख शेतकर्‍यांना फक्त 4 % दरानं दिलं 89810 कोटी रूपयांचं कर्ज, तुम्ही देखील मिळवू शकता Loan, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने 1 कोटी 1 लाख नवीन किसान क्रेडिट कार्डवर ( KCC) 89,810 कोटी रुपयांच्या स्वस्त कर्जास मान्यता दिली आहे. या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास वर्षाकाठी केवळ 4 टक्के व्याज आकारले जाईल. खरीप पेरणीत शेतकऱ्यांना यामुळे बरीच मदत मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 20.97 लाख कोटींच्या आर्थिक सवलतीच्या पॅकेजअंतर्गत सरकारने केसीसीमार्फत अडीच कोटी शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांशी संबंधित लोकांना दोन लाख कोटी रुपये सवलतीच्या कर्जाची घोषणा केली होती.

किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ही लहान शेतकर्‍यांसाठी एक महत्वाची योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांचे कर्जे कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. त्याचबरोबर 3 वर्षात शेतकरी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. या कार्डावरील व्याज दरही वर्षाकाठी 4 टक्के दराने आहे. आता याला पंतप्रधान किसान सन्मान निधीशी लिंक केले गेले आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासंबंधी सर्व आवश्यक माहिती ठेवणे महत्वाचे आहे.

111 लाख केसीसी जारी –
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट केले की, 24 जुलै 2020 पर्यंत आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत दोन लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या कर्जापैकी 111.98 लाख किसान क्रेडिट कार्डावर एकूण 89,810 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. याचा फायदा मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना होईल. त्या म्हणाल्या की, 30 जूनपर्यंत 70.32 लाख केसीसी
धारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते.

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी …
– किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी 5 वर्षात 3 लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीसाठी कर्ज घेऊ शकतात. 9 टक्के दराने कर्ज उपलब्ध असले, तरी सरकार त्यावर 2 टक्के अनुदान देते. या अर्थाने ते 7 टक्के होते. दुसरीकडे जर शेतकऱ्याने हे कर्ज वेळेवर परत केले तर त्याला 3 टक्के अधिक सूट मिळते. म्हणजेच, या अटीवर, कर्जावर त्याला फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्ष आहे. 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती. सर्व केसीसी कर्जावरील अधिसूचित पिके / अधिसूचित क्षेत्र पीक विम्यात समाविष्ट आहेत.

अर्ज करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साइटवर जावे लागेल. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाऊनलोड करा. आपल्याला हा फॉर्म आपल्या जमीनीच्या कागदपत्रांसह, पिकाच्या तपशिलासह भरावा लागेल. सोबतच आपण कोणत्याही बँक किंवा शाखेतून कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनविले नाही, अशी माहितीदेखील द्यावी लागेल. हा अर्ज भरून सबमिट करा, ज्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल. आयडी पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र / पॅनकार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग परवाना इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

– पत्ता पुरावा : मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग परवाना इ.

केसीसी कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक (आरआरबी) कडून मिळू शकते. हे कार्ड एसबीआय, बीओआय आणि आयडीबीआय बँकेकडून देखील घेता येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) रुपे केसीसी जारी करते.