किसान क्रेडिट कार्ड : SBI नं YONO कृषी प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं नवीन फीचर, जाणून घ्या कसा मिळणार याचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने योनो कृषी प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक नवीन फिचर जोडले आहे. एसबीआयने या फिचरचे नाव किसान क्रेडिट कार्ड रिव्यू ठेवले आहे. या नवीन फिचरनंतर आता शेतकऱ्यांना बँक शाखेत जाऊन त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा रिवाईज करण्याची गरज भासणार नाही. एसबीआयने म्हटले, ‘केसीसी रिव्यू पर्यायासाठी शेतकरी फक्त ४ क्लिकवर अर्ज करू शकतात. त्यांना कोणत्याही पेपर वर्कशिवाय घरात किसान क्रेडिट कार्ड मर्यादेला रिवाईज करण्याची सुविधा मिळेल.’

वेळेची बचत करू शकतील शेतकरी
एसबीआयचा असा विश्वास आहे की, आतापर्यंत जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात स्मार्टफोन आहे आणि हे लक्षात घेऊनच बँकेने त्यांना ही सुविधा देण्याचे पाऊल उचलले आहे. योनो कृषीमध्ये केसीसी रिव्यू सुविधेचा लाभ सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या पेपरलेस केसीसी रिव्यू फिचरमुळे केवळ शेतकऱ्यांचा वेळ वाचणार नाही, तर केसीसी मर्यादेला रिवाईज करण्यासाठी काळजी करण्याची गरज भासणार नाही. ही त्वरित प्रक्रिया कापणीच्या वेळी त्यांना मदत करेल.

एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, ‘योनो कृषीमध्ये केसीसी रिव्यू सुविधा देणे आमच्या शेतकरी ग्राहकांना आणखी एक सुविधा देणे आहे. ते त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहेत आणि हे त्यांच्यासाठी महत्वाचे देखील आहे. हे फिचर अंमलात आणताना आम्ही आमच्या कोट्यावधी शेतकरी ग्राहकांच्या सोयीची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. आता ते कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे त्यांच्या केसीसी मर्यादेला रिवाईज करू शकतील.’

योनो कृषीवर या सुविधाही उपलब्ध
केसीसी रिव्यू व्यतिरिक्त, बहुभाषिक योनो कृषी प्लॅटफॉर्मवर योनो खाते, योनो बचत, योनो मित्र आणि योनो मंडीची सुविधा देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. या सेवांच्या मदतीने शेतकरी कृषी कर्ज उत्पादनांच्या मदतीने शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी किंवा भाड्याने घेऊ शकतात. यामध्ये त्यांना गुंतवणूकीद्वारे पीक विम्याची सुविधादेखील मिळेल. त्यांना झटपट अ‍ॅग्री गोल्ड लोन मिळू शकेल आणि शास्त्रीय पद्धतीने शेतीची माहिती संकलित करू शकतील.

प्रसिद्ध होत आहे योनो कृषी प्लॅटफॉर्म
योनो कृषी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एसबीआयने शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती करण्याचा मार्ग दाखवला आहे. लॉन्च झाल्याच्या एका वर्षात योनो कृषीने सुमारे १४ लाख कृषी कर्ज जारी केले आहे. योनो मंडी आणि योनो मित्र वर १५ लाख क्लिक आले आहेत.