GDP मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान 30 टक्क्यांनी वाढवण्याची गरज : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, जीडीपीमध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्राचे योगदान 16 ते 17 टक्के आहे, त्यामध्ये 30 टक्के वाढ करणे आवश्यक आहे. जर आपल्याला या पातळीवर पोहोचायचे असेल तर खेड्यातून शहरांमध्ये होणारे स्थलांतर थांबवावे लागेल. ते म्हणाले की, जर लोकांना खेड्यांमध्ये रोजगार मिळाला तर ते शहरात का जातील?

गडकरी सिम्बायोसिस गोल्डन जुबली लेक्चर सीरिजमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने सर्वच क्षेत्रांना काम करावे लागेल. ते म्हणाले की, आज कॅबिनेटने वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ, विमानतळ व अन्य सामाजिक क्षेत्रात ‘व्हायबिलिटी गॅप’ म्हणून 40 टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, जेथे आर्थिक व्यवहार्यता नसेल अशा ठिकाणी हे प्रकल्प चालवले जाऊ शकतात.

कॉंग्रेसच्या कार्यकाळात संरक्षण सौद्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप देशव्यापी मोहीम राबवेल. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केल्यानंतर याची सुरुवात होऊ शकते. भाजप प्रामुख्याने अगस्ता वेस्टलँड डीलवरून कॉंग्रेसला घेरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने म्हटले आहे की, गुपकार गँगचा खरा चेहरा उघडकीस आल्यानंतर आता अगस्ता वेस्टलँड डीलमधील भ्रष्टाचाराबद्दल कॉंग्रेसला जाब विचारला जाईल. यादरम्यान पक्षाच्या देशभरात पत्रकार परिषदा घेतल्या जातील. इतकेच नाही तर इंटरनेटच्या माध्यमातूनही भाजप कॉंग्रेसविरुद्ध प्रचार करेल. नुकतेच, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अगस्ता वेस्टलँड प्रकरणात काँग्रेसवर निशाणा साधला होता.

राहुल गांधींनी कोरोना लशीबाबत विचारलेल्या प्रश्नांना भाजपने उत्तर दिले आहे. कोरोना लस निवडणे कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडण्याइतके सोपे नाही, असे भाजप नेते डॉ. विजय चौथाईवाले म्हणाले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘प्रिय राहुल तुम्ही गोव्यात सुट्टीचा आनंद घ्यावा. तुम्हाला हे समजणे फार कठीण आहे.’ महत्त्वपूर्ण म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधानांना विचारले होते की, त्यांनी सांगावे की कोरोनापासून नागरिकांच्या संरक्षणासाठी भारताने कोणती लस निवडली आहे. तसेच लस वितरणाच्या योजनेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.