मुरबाडमधून किसन कथोरे विक्रमी मतांनी विजयी

मुरबाड :  पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड विधानसभा एकूण मतदान 2 लाख 32 हजार मतदान झाले असून मुरबाड विधानसभेत बीजेपीचे किसन कथोरे हे विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा 1,67,859 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांना 36,523 मते मिळाली तर भाजपाचे किसन कथोरे यांना 1,67,859 मते मिळवून विक्रमी विजय मिळवला त्याच बरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा दारुण पराभव केला.

मुरबाड मध्ये आमदार कथोरे साहेबांच्या तिसऱ्या विजयाने मुरबाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून विजयी रॅलीला ढोल ताशांच्या गजरात मोठ्या थाटात विजयी मिरवणुक काढली तर या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या विक्रमी विजयाचा संपूर्ण मतदारसंघात आनंद व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com