शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘इथं’ शेती करणाऱ्याला दरवर्षी मिळणार 31 हजार रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारच्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळे झारखंडमधील ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला प्रतिवर्षी २५ हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान किसान निधी स्कीम व्यतिरिक्त हे २५ हजार रुपये शेतकऱ्याना दिले जाणार आहेत. या निधी अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी ३१ हजार रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत येत्या शनिवार पासून हि योजना सुरु करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत ३५ लाख शेतकऱ्याना सुमारे ३ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

कोणाला किती भेटणार लाभ ?
एकरी ५ हजार रुपये या हिशोबाने ५ एकर पर्यंत वर्षाला २५ हजार रुपये मिळणार
दोन हफ्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्याना मिळणार
पहिल्यांदा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत
मूळ राज्यातील जनतेलाच याचा लाभ भेटणार, बाहेरून येऊन राज्यात येऊन जमीन घेणाऱ्याना याचा लाभ मिळणार नाही.