30 वर्षांपासून 3 सरकारी विभागात ‘सक्रिय’ होता हा ‘नटवरलाल, ‘या’ एका चुकीमुळे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार पोलिसांनी एका अशा भामट्याला अटक केली आहे. जो एका ठिकाणी नाही तर चक्क तीन ठिकाणी सरकारी नोकरी करत होता. इतकेच नाही तर प्रत्येक ठिकाणी तो पगार देखील घेत होता. गेली अनेक वर्ष त्याचा हा कारनामा कुणाच्याही लक्षात आला नाही. त्याने मागील 30 वर्षांपासून अशाप्रकारे नोकरी केली असून 30 वर्ष याचा पगार देखील घेतला.

सुरेश राम असे या भामट्याने नाव असून तीनही ठिकाणी त्याला वेळोवेळी प्रमोशन देखील मिळत असे. मात्र शेवटी त्याची हि करामत पोलिसांच्या लक्षात आली आणि अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपी सुरेश राम हा पटनामधील रहिवासी असून CFMS मध्ये सहाय्यक इंजिनियर म्हणून काम करत होता. मात्र त्याची चालाखी लक्षात आल्याने तो पकडला गेला. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले आधार नंबर, पॅन कार्ड नंबर आणि तारीख भरणाच्या वेळी त्याच्या या चालाखीचा भांडाफोड झाला आणि तो पकडला गेला.

तीन ठिकाणाहून घेत होता पगार

Advt.

CFMS प्रणालीच्या माहितीमध्ये त्याचा हा घोटाळा पकडला गेला. यामध्ये सुरेश राम नावाच्या तीन व्यक्ती आढळून आल्या. यामध्ये जल संसाधन विभागात एक तर दुसऱ्या विभागात एक सहाय्यक इंजिनियर म्हणून तर तिसरा व्यक्ती किशनगंज परिमंडळामध्ये सहाय्यक इंजिनियर म्हणून आढळून आला. विशेष म्हणजे तीनही ठिकाणी त्याने दिलेली माहिती समानच होती. प्रकरण समोर आल्यानंतर राज्याचे उपसचिव चंद्रशेखर प्रसाद सिंह यांनी त्याला सर्व प्रमाणपत्र घेऊन पाटनामधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. मात्र तो त्याठिकाणी न येताच फरार झाला.

पुढील वर्षी होणार होता निवृत्त

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुरेशराम पुढील वर्षी निवृत्त होणार होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला आहे. 20 फेब्रुवारी 1988 मध्ये तो सरकारी सेवेत रुजू झाला होता. जर CFMS प्रणाली आली नसती तर त्याचा हा घोटाळा कुणाच्याही लक्षात आला नसता.

आरोग्यविषयक वृत्त –