सांगलीतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक किशोर पंडित यांचं निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अनंत गणेश पंडित सराफ पेढीचे किशोर अनंत पंडित (वय ६१) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. किशोर पंडित यांना दुपारी बाराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं; पण वाटेतच त्यांची प्राणज्योत माळविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. जिल्हा सराफ असोसिएशनचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंडित हे गेली पंधरा वर्षे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक होते.

महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णालंकार फेडरेशनचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. जिल्हा सराफ असोसिएशनचे मार्गदर्शक टिळक स्मारक मंदिरचे विश्वस्तपदी त्यांनी काम पाहिलं होतं.