‘अमृता वहिनींना आवरा, देवेंद्र फडणवीसांमुळेच सरकार आलं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेतून पायउतार झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्विटच्या माध्यातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडत असल्याने अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात ट्विट युद्ध सुरु आहे. आता या प्रकरणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी थेट संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी दोघांना आवर घालण्याची विनंती केली आहे.

किशोर तिवारी यांनी भैय्याजी जोशी यांना लिहलेल्या पत्रातून देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांना आवर घाला, अमृता यांचा राजकीय हस्तक्षेप थांबवा, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे. तसेच देवेंद्र आणि अमृता यांच्या उर्मटपणामुळे, शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकली नाही. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे 2024 मध्ये भाजपला नुकसान होऊ शकते असेही पत्रात त्यांनी म्हटले आहे.

हिंदू पक्ष दुरावत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे शिवसेनेवर ज्या प्रकारे टीका करत आहेत त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत. ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही आणि भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. हे सगळ फडणवीस यांच्या आरेरावीमुळे घडल्याची तक्रार तिवारी यांनी पत्रातून केली आहे.

अमृता यांचे ट्विट अशोभनिय
अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट अशोभनिय आहे. त्यांचे असं वागणे हे भारतीय संस्कृतीत पती आणि पत्नीच्या नात्याला धक्का देणारं आहे. अमृता यांना भाजप पक्ष चालवायचा आहे का ? असा तिखट सवाल तिवारी यानी केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांची पत्नी कधी कुणावर टीका करत नाहीत, अशी आठवण देखील तिवारी यांनी या पत्रातून करून दिली आहे.

You might also like