अखिल भारतीय प्रजापति संघाच्या जिल्हा महासचिवपदी किशोर जाधव यांची नियुक्ती

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय प्रजापति (कुम्भकार) संघाच्या नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांना नाशिक जिल्हा अखिल भारतीय प्रजापति संघाच्या महासचिवपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले.

यावेळी नाशिक विभाग व जिल्हा संपूर्ण कार्यकारणीचीही नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्हा अध्यक्ष तुळशीराम एकनाथ मोरे, उपाध्यक्ष पोपट रामचंद्र बोरसे, नाशिक शहर अध्यक्ष बाळासाहेब जगन्नाथ जाधव, नाशिक जिल्हा सचिवपदी पुंडलिक त्र्यंबक सोनवणे, विभागीय सचिव गुलाबराव काशीराम सोनवणे, विभागीय उपाध्यक्ष विलास माधवराव भालेराव आदी पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले.

याप्रसंगी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश इतर राज्यांमध्ये कुंभार समाजाला मिळणाऱ्या सवलती-सुविधा, आरक्षण त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही समाजास न्याय मिळावा असे मागणी करण्यात आली व तसे निवेदन महाराष्ट्र शासनास देण्याचे ठरले.

जास्तीत जास्त आपल्या अनुभवाचा व समर्पित सेवांच्या माध्यमातून संविधानानुसार संघ संघटनेला निरंतर गती देऊन समाज बांधवांना संघाशी जोडून एक चांगले राष्ट्र व सुदृढ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करू असे मत किशोर जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केले. समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्या निवडबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like