Kishori Pednekar | ‘मंत्रिपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही’ – किशोरी पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar | जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना (Shivsena) आमचीच, धनुष्यबाण आमचेच, बाळासाहेबही (Balasaheb Thackeray) आमचेच असे म्हणणार्‍यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही का, असा सवाल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांना केला आहे.

 

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) पुढे म्हणाल्या की, मंत्रिपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकाही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वत: च्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे याचा विडा यांनी उचलला आहे, असा घणाघात पेडणेकर यांनी केला.

 

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपावर (BJP) टीका करताना म्हटले की, बहुभाषिक मुंबईत, मराठी मुंबईत मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) हे विकासक आहेत, आमदार आहेत, भाजपने त्यांना मंत्रीपद दिले, पण आमच्यातून गेलेले, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे.

 

मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात (Cabinet Expansion) पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre),
दादा भुसे (Dada Bhuse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar),
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
तर भाजपमधून गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil),
अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
आणि मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

 

Web Title : –  Kishori Pednekar | balasaheb thackeray wasnt remembered while taking the oath of office kishori pednekar criticized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा