Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर सध्या एसआरए घोटाळ्याची (SRA Scam) चौकशी सुरु आहे. आज (दि. 01) त्यांची दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) अडीच तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी माझी अडीच तास चौकशी केली. यावेळी जास्त वेळ गप्पांमध्येच गेला. पोलिसांनी मला अनेक प्रश्न विचारले. मी त्यांना माहीत असलेली उत्तरे दिली. पोलिसांनी या नंतर मला चौकशीला बोलावले नाही, असे पेडणेकर म्हणाल्या. झोपडपट्टी पुनर्वसन SRA मध्ये घोटाळा करुन विकासकाकडून सहा गाळे आपल्या नावे केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. त्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या कर नाही त्याला डर कशाला?. पोलिसांनी मला तीन दिवसांपूर्वी फोन केला होता.
त्यावेळी मी त्यांना व्यग्र असल्याचे सांगितले होते. पण चौकशीला कोणत्याही परिस्थितीत येणार असल्याचे देखील त्यांना सांगितले. त्याप्रमाणे मी आज चौकशीला गेले होते. आणि पोलिसांनी गप्पा मारत माझी चौकशी केली.
परंतु हे प्रकरण ज्याप्रकारे रंगविले जात त्यातील 10% देखील खरे नाही. साप समजून दोरीला बडविण्याचा हा प्रकार आहे.
मी कायद्याची लढाई लढत आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटून माझे निवेदन
त्यांना देणार आहे. मुख्यमंत्री मूळ शिवसैनिक आहेत.
म्हणून मी त्यांना भेटणार आहे, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
वरळी येथील गोमाता नगर येथे विकासकाने एका प्रकल्पातील सहा गाळे किशोरी पेडणेकर यांना दिल्याचा आरोप
सोमय्या यांनी केला होता. याविरोधात किरीट सोमय्यांनी मागील अनेक दिवस आवाज उठवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. या तिघांची चौकशी केली होती.
यावेळी संबंधितांनी किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतले होते. त्यावरुन पेडणेकर या चित्रात आल्या होत्या.

Web Title :-  Kishori Pednekar | kishori pednekar was interrogated for two and a half hours by the dadar police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 35 हजारांचे घेतले दीड लाख रूपये; शेकडा 10 टक्क्यांनी उकळले व्याज, आरोपीला अटक

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारे टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’