Kishori Pednekar | SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) शुक्रवारी (28 ऑक्टोबर) रोजी त्यांची चौकशी झाली. त्यांना शनिवारी (दि. 29) देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एसआरए (SRA) घोटाळ्यात किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांची चौकशी करण्यात आली आहे.

एसआरएमध्ये फ्लॅटचा ताबा देण्यात फसवणूक (Cheating Case) झाल्याचा किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतले होते. त्यामुळी किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी झाली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत आवाज उठवला होता.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “किशोरी पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशनमध्ये यावे लागणार आहे. दादर पोलीस स्टेशन १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री, किश कॉर्पोरेट कंपनी (Kish Corporate Company) विरुद्ध मरीन लाईन्स पोलीस स्टेशनची (Marine Lines Police Station) चौकशी आणि वरळी 6 SRA फ्लॅटच्या बेकायदेशीर ताबा तसेच किश कॉर्पोरेट कंपनीला बीएमसी कोविड कॉन्ट्रॅक्ट देणे आदी प्रकरणांत किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे”

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात न्यायालयात (Court) याचिका (Petition) दाखल केली आहे.
त्यामुळे मागील काही दिवस ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक नेत्यांवर विविध संकटे येत आहेत.
संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाली असून, त्यांच्या पीएमएलए
(Prvention of Money Laundering Act) न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
चिपळूण येथील रिसॉर्ट अनिल परब (Anil Parab) यांच्या नावावर असल्याचे देखील त्यांच्यावर आरोप होते.
त्यामुळे हे रिसॉर्ट आता पाडण्यात येणार आहे.

Web Title :-  Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिवसेनेचे टीकास्त्र, ‘राज्यात लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळेच सोन्याची…’

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला धरले जबाबदार, म्हणाले – ‘भाजप सरकार सत्तेवर यायला कोण…’