Kishori Pednekar On Amrita Fadnavis | अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायले गाणे; म्हणाल्या – ‘अशी कशी नशीबाने थट्टा मांडली…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar On Amrita Fadnavis | सोशल मीडियावर अधुन-मधून पोस्ट करत राजकीय विरोधकांवर, विशेषता शिवसेनेवर (Shivsena) टीका करणार्‍या अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांची आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी खिल्ली उडवली आहे. यासाठी पेडणेकर यांनी एका मराठी चित्रपटातील गाण्याचा आधार घेतला आहे. दरवेळी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) विषारी बाणाने टीका करण्याने त्यातून उलट उद्धव ठाकरेंची आणखी प्रसिद्धी होते, असे म्हणत पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, आमच्या विधानसभेच्या संघटक अनुपमा परब (Anupama Parab) यांनी एक गाणे लिहिले आहे. मी गायिका नाही. कलाकार नाही. गद्यभाषेत मी बोलून दाखवेन. आवडले तर घ्या नाहीतर सोडून द्या. ‘एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव. मुख्यमंत्रिपदासाठी कटकारस्थानं केली, त्यांना एका अमृताची दृष्ट लागली हो.. त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रिपद आले. अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली, अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
40 आमदार शिंदे गटात (Shinde Group) गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
शिवाय राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळले होते.
या नामुष्कीवरून अमृता फडणवीस यांनी खोचक टीका केली होती.
कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असे अमृता यांनी म्हटले होते.
बस बाई बस या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते.
याच टीकेला शिवसेनेने हे प्रत्युत्तर दिले आहे. (Kishori Pednekar On Amrita Fadnavis)

 

या कार्यक्रमात सूत्रसंचालक अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकल्यावर कुणाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असं विचारले असता अमृता यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते.
उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते,
पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला, असे अमृता म्हणाल्या होत्या.

 

Web Title : – Kishori Pednekar On Amrita Fadnavis | a song sung by shivsena leader kishori pednekar on amrita fadnavis wife of devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा