Kishori Pednekar On Raj Thackeray | महापौर किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar On Raj Thackeray | मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांकडून राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जात आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, दोन वर्षापासून भाषण केलेलं नाही, मोरीत खूप तुंबलंय. बरंच काही बोलायचंय, अशा शब्दात केली. याच मुद्यावरुन मुंबईच्या महापौर (BMC Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. महागाई विरोधात युवासेनेच्या (Yuvasena) वतीने करण्यात आलेल्या ‘थाळी बजाओ’ आंदोलनात (Agitation) किशोरी पेडणेकर बोलत होत्या. (Kishori Pednekar On Raj Thackeray)

 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल. पण त्यातून काही निघालं नाही. त्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे (BJP) गांडूळ निघाले. अशा गांडुळांना पोसण्याचे काम लोकांनी करू नये. काल बोलताना ते म्हणाले की, मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना, खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांच्याच स्वत:साठी प्रयत्न होता. अशी टीका त्यांनी केली.

 

त्या पुढे म्हणाल्या, गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना यांच्याप्रती असलेल्या द्वेषातून राज ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) अनेकांना घडवलं,
त्यात राज ठाकरे ही घडले पण ते असे का बिघडले, हेच कळेना, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.

 

Web Title :-  BMC mayor kishori pednekar slams raj thackeray speech

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi Bold Hot Photos Videos | डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केला छातीवरचा ‘तिळ’, फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके !

 

Kangana Ranaut Killer Look | कंगना रानौतनं पर्पल शिमरी थाई-हाई स्लिट गाऊन घालून दिल्या किलर पोज

 

Post Office Started New Service | पोस्ट ऑफिसने सुरू केली नवीन सेवा ! आता घरबसल्या PPF, RD, सुकन्या समृद्धीमध्ये (SSY) करा गुंतवणूक