Kishori Pednekar On Yashomati Thakur | ‘…तर तुम्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिल्या नसता, पहिल्यांदा मंत्रिपद मिळालंय नीट काम करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kishori Pednekar On Yashomati Thakur | राज्यात तीन पक्षांची सत्ता असली तरी कोणत्या ना कोणात्या मुद्द्यावरून त्यांच्यात पंधरा दिवसाला काहीना काही कुरबुरी ऐकायला मिळतात. अशातच आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर (Kishori Pednekar On Yashomati Thakur) निशाणा साधला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) असते तर आज चित्र वेगळं असतं, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं. अमरावतीमधील (Amravati) डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Dr. Punjabrao Deshmukh’s death anniversary) श्रद्धांजलीपर कार्यक्रमावेळी एकाच मंचावर यशोमती ठाकूर, शरद पवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) इ. मान्यवर उपस्थित होते. या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

यशोमती ठाकूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शरद पवार (Sharad Pawar) या सरकारमध्ये महर्षी म्हणून काम पाहत आहेत. तुमचं जर असंच म्हणणं असतं तर तुम्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिल्या नसता. पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आहे नीट काम करा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)
यांनीही ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता यशोमती ठाकूर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Kishori Pednekar On Yashomati Thakur | shiv sena leader kishori pednekar slams yashomati thakur over sharad pawar statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा